
नॉर्दन इन्फ्रा डेव्हलपर्स
नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात आपल्या नाविन्यपूर्ण आणि अतिशय नियोजनबद्ध कामासाठी प्रसिद्ध असलेले नाव.
About Us


नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात आपल्या नाविन्यपूर्ण आणि अतिशय नियोजनबद्ध कामासाठी प्रसिद्ध असलेले नाव. सर्वांच्या बजेटचा सर्वसमावेशक विचार करून नॉर्दन इन्फ्रा डेव्हलपर्स नेहमीच खिशाला परवडणारे नवनवीन प्रोजेक्ट्स घेऊन येत असतात. असंख्य सुखी परिवारांच्या विश्वासावर ही यशस्वी वाटचाल गेली अनेक दशके अखंड चालू आहे. आधुनिकतेसोबत निसर्गाची साथ महत्वाची असते. घर प्रसन्न आवारात हवे; त्याचबरोबर तिथे सर्व महत्वाच्या सुखसोयी असाव्यात याकडे नॉर्दन इन्फ्रा डेव्हलपर्स कटाक्षाने लक्ष देत असतात.
आपल्या जीवनशैलीचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून अविरत प्रयत्नशील असणारे नॉर्दन इन्फ्रा डेव्हलपर्स नाविन्य आणि निसर्ग यांचा अभूतपूर्व संगम साधत नेहमीच अद्भुत आणि आश्चर्यकारक कामांना तडीस नेत आले आहेत. अचूक नियोजन आणि कामावरील जबरदस्त निष्ठा यांच्या बळावर नेहमीच वेळेत काम पूर्ण करत असल्यामुळे ‘नॉर्दन इन्फ्रा डेव्हलपर्स’ हा ब्रँड नाशिक रियल इस्टेटच्या विस्तीर्ण आकाशात ध्रुव ताऱ्यासारखा अढळ बनला आहे. हजारो परिवारांना नाविन्यपूर्ण आणि बजेटमधील घरे वेळेत सुपुर्द करणारे नॉर्दन इन्फ्रा डेव्हलपर्स- हे नेहमीच आदराने घेतले जाणारे नाव आहे.

